इंजिनीअरिंगच्या वाटेवर जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. मात्र गुणवत्तेच्या स्पर्धेत अनेकांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. त्यामुळे या अभ्यासक्रमाचा प्रवेश या प्रक्रियेसंबंधी विद्यार्थ्यांना पुरेसे ज्ञान मिळावे, पालकांच्या शंकांचे निरसन व्हावे आणि प्रात्यक्षिक अभ्यासाचा नवा मार्ग विद्यार्थ्यांसमोर खुला व्हावा, याकरिता लोकमंगल फाउंडेशन व ए.डी. जोशी ज्युनियर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने इंजीनियरिंग मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जे. के. बी. आय टी सोल्युशन मुंबईचे संचालक प्रा. विनायक शेटे, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे अध्यक्ष मनोज माडगूळकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी CET किंवा JEE परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना CAP Round : Option Form साठी महाराष्ट्रात इंजिनीरिंग कॉलेज ची संख्या किती, त्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस कोणते, त्या कोर्सेस साठी उपलब्ध जागा किती, त्यानंतर आपल्याला मिळालेल्या मार्कनुसार कुठल्या कॉलेजमध्ये आपल्याला साधारण ऍडमिशन मिळू शकते, फॉर्म कसा भरायचा, प्रायोरिटी कशी द्यायची, रॅकिंग कसं करायचं, कॉलेजेसमध्ये फी किती आहे, राखीव जागा किती आणि कशाप्रकारे आहेत याबद्दल सखोल माहिती देण्यात आली. या शिबिराचा लाभ जवळपास 200 विद्यार्थी व पालकांनी लाभ घेतला.
यावेळी लोकमंगल फाउंडेशनचे अजित कंडरे, मारुती तोडकर, डॉ. शिवराज सरतापे तसेच ए.डी. जोशी ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.