सोलापूर : सोलापूर या वर्षीचा लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळा कोरोनाच्या नियमाच पालन करून येत्या २७ डिसेंबरला गोरज मुहूर्तावर हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर साजरा होणार आहे. लोकमंगल फाऊंडेशनतर्फे होणाऱ्या या विवाह सोहळ्याची सारी यंत्रणा सज्ज आहे. आणि ती सगळ्या पूर्वतयारीला लागली आहे.
लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे १४ वे वर्ष असून आजवर २ हजार ८८१ जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहेत. यंदाही या सोहळ्यात जास्तीत जास्त जोडप्यांचा विवाह लावण्याचा संकल्प आहे. या सोहळ्याला आता एका सामाजिक चळवळीचे रूप प्राप्त झाले आहे.इच्छुकांना या सोहळ्याची अधिक माहिती व्हावी यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लोकमंगल बँक, लोकमंगल नागरी पतसंस्था, लोकमंगल साखर कारखाना, लोकमंगल मल्टीस्टेट,लोकमंगल जीवक हॉस्पिटल आदि ठिकाणी १२५ माहिती केन्द्रे उभारण्यात आली आहेत. हा विवाह सोहळा सर्वधर्मीय असल्याने हिंदू. बौंद. मुस्लीम, जैन, स्वरिशचिन अशा कोणत्याही तरूण तरुणींना या सोहळ्यासाठी नाव नोंदणी करता येईल.
सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाचे अनुदान मिळते. या सोहळ्यात विवाह होणाऱ्यांना ते अनुदान मिळवून देण्यासाठी लोकमंगल फाउंडेशन मदत करील. या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू- वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, वऱ्हाडी मंडळीच्या भोजनाची सोय, मामांकरिता मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे देण्यात येतात. ताट. वाटी,गल्लास प्रत्येकी 5 नग, बाळकृष्ण,स्टील हंडा, स्टील,उबा, तांब्या असे संसारोपयोगी साहित्य दिल्ले जाते.
तरी या विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणी सोलापूर येथील त्रोकमंगल फाउंडेशनच्या कार्यालयात सुरू आहे. .नाव नोदणी ची अंतिम तारीख 20 डिसेंबर असून अधिक माहिती 9657709710 या क्रमांकावर वर संपर्क साधावा.