सोलापूर ; लोकमंगल फाउंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थापक अध्यक्ष तथा आ. सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 31 डिसेंबर 2023 रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या (डी.एड. कॉलेज) भव्य प्रांगणात सायंकाळी गोरज मुहूर्तावर विवाह सोहळा पार पडणार आहे. यंदाच्या सोहळ्यात जास्तीत जास्त जोडप्यांचा विवाह लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
लोकमंगल फाउंडेशन सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण, आरोग्य, क्रीडा, अध्यात्म आदी अनेक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील लोकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य निरंतर सुरु आहे. सोलापूर व पंढरपूर येथे निराधार वृद्धांसाठी मोफत अन्नपूर्णा योजना सुरू आहे. या योजनेमार्फत 500 पेक्षा जास्त निराधार जेष्ठ नागरिकांना दोन वेळचे जेवणाचे डबे मोफत घरपोच दिले जातात. समाजातील सर्व स्तरातील जनतेला सामाजिक उपक्रमातून एकत्रित आणून समाजात बंधुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न लोकमंगल फाउंडेशन करीत आहे. विवाह हा एक जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. तो पार करत असताना समाजातील सामान्य नागरिकांना विवाहाचा आर्थिक खर्च सहन करावा लागतो. विवाहवेळी येणाऱ्या अडचणींना होणारी पैशाची उधळण, जाचक हुंडा पद्धती, मनुष्यबळाची अडचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टींचा विचार करून आ. सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे यशस्वी आयोजन करीत आहेत. आजपर्यंत 3024 जोडपी विवाह सोहळ्यामध्ये विवाहबद्ध झाली आहेत. यंदाचा सामुदायिक विवाह सोहळा रविवार, 31 डिसेंबर 2023 रोजी विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात गोरज मुहूर्तावर पार पडणार आहे. लोकमंगल फाउंडेशन सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे 18 वे वर्ष आहे. विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये लोकमंगल बँक, लोकमंगल नागरी पतसंस्था, लोकमंगल मल्टीस्टेट, आदी अनेक ठिकाणी एकूण 125 पेक्षा जास्त माहिती केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.
या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू-वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, वऱ्हाडी मंडळीच्या भोजनाची सोय, मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे देण्यात येतात. ताट, वाटी, ग्लास प्रत्येकी 5 नग, स्टील हंडा, स्टील डबा, तांब्या आदी संसारोपयोगी साहित्य दिले जाते. वधू- वरांची सोलापूर शहरातून दोन वेगवेगळ्या मार्गावरून वरात काढली जाते. प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जातात.
तरी या विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणी सोलापूर येथील लोकमंगल फाउंडेशनच्या कार्यालयात सुरु आहे. 20 डिसेंबर पर्यंत नाव नोंदणी करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस डॉक्टर शिवराज सरतापे, सुनील गुंड, शशी थोरात, मारुती तोडकर, दिपाली कोठारी. ही उपस्थित होते.
- संपर्कासाठी पत्ता :- लोकमंगल फाऊंडेशनचे ऑफिस अन्नपूर्णा 13 अ, सह्याद्री कॉलनी, सोलापूर मो. 9657709710