No Result
View All Result
भरडधान्य महोत्सवाचा शुभारंभ
- सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील बचतगटांना 212 कोटी रूपये कर्जवाटप करणेत आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या आवारात आज भरडधान्य महोत्सवांचे आयोजन करणेत आले होते. या महोत्सवांचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आले. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, प्रकल्प संचालक उमेश कुलकर्णी, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांचे सह उमेदचे जिल्हा व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक उपस्थित होते.
- या प्रसंगी बोलताना सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील बचतगटांना 212 कोटी रूपये कर्जवाटप करणेत आले आहे. एनपीएमध्ये खाते जाणार नाही याची काळजी घ्या. बॅंका खुप विश्वासाने कर्जसहाय्य करतात. विश्वास जपा. परतफेड वेळेत करा. शासनाने दिलेले उदिष्ठ्यापेक्षा अधिक कर्जवाटपाचे काम केले आहे. असेही सिईओ – दिलीप स्वामी यांनी या महोत्सवानंतर तालुका अभियान व्यवस्थापक यांची बैठक घेऊन सुचना दिल्या.
- भरडधान्य शरीरास अधिक पोषक – सिईओ स्वामी
सोलापूर जिल्ह्यात गहू या पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते. सोलापूर जिल्ह्यत भरड धान्याचे उत्पादन घेतले तर भरडधान्य शरीरास अधिक पौष्टिक असते तसेच विविध जीवनसत्त्वांचा उपयोग शरीराला भरडधान्य मुळे होतो तरी शेतकऱ्यांनी इतर नगदी पिकांबरोबरच भरडधान्य देखील घ्यावेत असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. ज्वारी, बाजरी, राजगिरा, नाचणी ही भरडधान्य आहेत. केंद्र शासनाने कमी पाण्यात येणारी पिके म्हणून भरडधान्य घेणे कडे कल दिला आहे. या अभियानात सहभागी व्हा. शेतकरी बांधवांनी स्वत ला लागणारा भाजीपाला व भरडधान्य ही पिके घ्यावीत. पोषक द्रव्ये असलेली भरडधान्ये फायदेशीर आहेत. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
- तृणधान्ये ला परत पुनर्रवैभव द्या – अतिरिक्त सिईओ कोहिनकर
मिलेटस् अशा पद्धतीने वापरा
सर्वप्रथम हलके स्वच्छ पाण्याने धुवून घ्या म्हणजे त्यावरील माती कचरा निघून जाईल. नंतर मिलेटस्/भरडधान्ये आठ ते दहा तास पाण्यात भिजवून घ्यावेत , नंतर सुकवून वाळवून वापरावेत. एक गोष्ट निश्चितपणे भरडधान्ये /तृणधान्ये ला परत पुनर्रवैभव करून देणे हे मानव व मानवी आरोग्य व अखिल जीवसृष्टीसाठी क्रांतिकारी पाऊल आहे. असेही अतिरिक्त सिईओ संदीप कोहिनकर यांनी केले.
- भरडधान्याचे महत्व सांगा – शेळकंदे
सोलापूर जिल्ह्सात भरडधान्य घेणेस मोठा वाव आहे. असे मत उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी व्यक्त केले. सर्व ग्रामपंचायती मध्ये भरडधान्याबाबत जनजागृती करून भरडधान्याचे महत्व समजावून सांगा असे आवाहन केले. यावेळी जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, मीनाक्षी मडीवळी, अमोल गलांडे इ उपस्थित होते.आभार जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांनी मानले.
No Result
View All Result