सोलापूर – शाळेचे पटसंख्या वाढविण्यासाठी गुणवत्ता पुर्ण शिक्षण द्या. स्वच्छ शाळा व सुंदर शाळा हा उपक्रम शालेय शिक्षण वर्षात सुरू ठेवणेत येणार आहे. पट संख्या वाढवा. शिक्षण विभागाच्या अस्तित्वासाठी दशसुत्री हा पाया आहे. असे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले. समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी जिल्हा स्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करणेत आले होते. या एक दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सिईओ दिलीप स्वामी बोलत होते. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी संजय जावीर, डाएट चे प्राचार्य रामचंद्र कोरडे, शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, क्रांती कुलकर्णी, शशीकांत शिंदे, इब्राहिम नदाफ प्रमुख उपस्थित होते.
दहा हजार लोकसंख्येचे गावात एलकेजी व युकेजी – सिईओ स्वामी
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार लोकसंख्येचे गावात एलकेजी व युकेजी वर्ग सुरू करणेचा विचार सुरू असल्याचे सिईओ दिलीप स्वामी
यांनी सांगितले. गरीब शेतकरी यांचे मुलांना शिकविणेची खुप इच्छा असते. आपले शिक्षण योगदान देतील का ? पटसंख्या टिकून राहणेस यामुळे मदत होईल. नाविण्यपिर्ण उपक्रम म्हणू न या कडे पहा. असेही सिईओ स्वामी यांनी सांगितले.बालस्नेही ग्राम व महिला स्नेही ग्राम करा. सुर्य नमस्कार सातत्याने सुरू ठेवा. ७५ लाख सुर्य नमस्कार विद्यार्थ्यांकडून करून घ्या. ज्ञानप्रकाश फाऊंडेशन चा सर्वेक्षणाची अंमलबजावणी करा.
लेट्स चेंज मध्ये सोलापूर जिल्हा राज्यात तृतीय
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने लेट्स चेंज मध्ये सोलापूर जिल्हा राज्यात तृतीय आली आहे. या उत्कृष्ठ कामा बद्दल शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय जावीर व विस्तार अधिकारी स्वाती स्वामी यांनी उत्कृष्ठ जिल्हा समन्वयक म्हणून काम केलेबद्दल सिईओ स्वामी यांचे हस्ते सत्कार करणेत आला.
शिक्षण विभागाचे अस्तित्वासाठी दशसुत्री उपक्रम हा पाया – सिईओ दिलीप स्वामी
निपुण भारत मध्ये शैक्षणिक उपक्रमा मध्ये आमुलाग्र बदल करणेत आले आहेत. गुणवत्ता वाढी साठी प्रयत्न करा. पटसंख्या टिकवून ठेवा. पटसंख्येसाठी चांगली गुणवत्ता असणे आवश्यक आहे. असे सांगून दिलीप स्वामी म्हणाले, शिक्षण विभागाचे अस्तित्व पटसंख्येवर आहे. चांगली गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणे साठी दशसुत्री ची प्रभावी अंमलबजावणी करा असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.
तंत्रस्नेही बना, उपक्रमाचे माहिती पट बनवा
आनंदी जिवन जगा. आनंदी राहण्यात श्रीमंतीशी संबंध नाही. आनंदी रहा तंत्रस्नेही बना. या माध्यमातून शिक्षण प्रणाली विकसित करण्यात येईल. दिक्षा अॅप चा वापर करा. रिड टू मी, दिक्षा या अॅप चा प्रभावी वापर करा. संगणक साक्षर व्हा. तालुका स्तरावर तंत्रस्नेही शिक्षकांसाठी माहिती बनविणे साठी शालेष शिक्षण विभागाने माहिती पट स्पर्धा आयोजित केली आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
शाळा व अंगणवाडीस नळकनेक्शन द्या
अंगणवाडीला शाळेत सहभागी करून घ्या. अंगणवाडी हा आपले शाळेचा एक भाग आहे. ती पिढी आपले शाळेत येणार आहे. या दृष्टिकोनातून अंगणवाडी तील बालकांचा आढावा घ्या. असेही सिईओ स्वामी यांनी सांगितले. शाळा व अंगणवाडी साठी नळकनेक्शन द्या.पिणेचे पाणी देणेचे पुण्याचे काम करा. सुपरवायझर यांचे रिपोर्टची क्राॅस तपासणी करणार असल्याचे सिंईओ स्वामी यांनी सांगितले.
दशसुत्री ची प्रभावी अंमलबजावणी करा
नव्या जोमाने आपले शाळेत दशसुत्री उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा असे आवाहन केले. दशसुत्री हा शिक्षण विभागाचा पाया आहे. दशसुत्री मध्ये उत्कृष्ठ काम करणारे केंद्रप्रमुख यांचा गैरव करणार असल्याचे सिईओ स्वामी यांनी सांगितले. प्रत्येक घटकाला प्रेरीत करा. या उपक्रमाचे चांगले परिणाम दिसून येत आहेत असेही स्वामी यांनी सांगितले.
डायट वेळापूर कडील अधिव्याख्याता डॉ इब्राहिम नदाफ यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी मार्गदर्शन केले तर डॉ इरफान इनामदार यांनी स्टार्स प्रकल्प या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. अधिव्याख्याता डॉ क्रांती कुलकर्णी यांनी पहिले पाऊल व पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री जंबेनाळ बालसंगोपन व शिक्षण याविषयी मार्गदर्शन केले. नाविन्यपूर्ण उपक्रम व गुणवत्ता वाढ नियोजन याविषयी श्री शशिकांत शिंदे यांनी मार्गदर्शन करताना आगामी वर्षात कोणत्या बाबींकडे अधिक भर देण्याची गरज आहे यावर चर्चा केली.
मुख्यालयातील विस्तार अधिकारी श्रीमती स्वाती स्वामी यांना स्वच्छता अभियान अंतर्गत लेट्स चेंज या उपक्रमात राज्यस्तरावरील उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सोलापूर जिल्हा राज्यात बेस्ट ऑफ फाईव्ह ठरल्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री संजय जावीर यांना सन्मानपत्र वितरित करण्यात आले. MPSP मुंबई यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांना Tablets प्राप्त झाले आहेत. त्याचेही वितरण सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात गटशिक्षणाधिकाऱ्यांना करण्यात आले.
परिषदेत विद्यार्थी आधार अपडेशन व संचमान्यता याविषयी माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख यांनी मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी (योजना) श्रीमती सुलभा वटारे यांनी विविध शासकीय विद्यार्थी लाभार्थी योजनांची माहिती दिली. प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी परिषदेचे प्रास्ताविक केले. विस्तार अधिकारी सुहास गुरव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विस्तार अधिकारी श्रीमती गोदावरी राठोड, रतिलाल भुसे, अतहर दफेदार, अधीक्षक प्रताप रुपनर व संगणक प्रोग्रामर चंदरकी, आब्बास शेख यांनी परिश्रम घेतले