विजापूर नगर हद्दीत शांतता कमिटी बैठक संपन्न..
सोलापूर : विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश उत्सव मंडळाचे काल सायंकाळी मांगल्य मंगल कार्यालय येथे शांतता कमिटीची कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी सर्व मंडळांना योग्य रीतीने योग्य त्या सुचना देण्यात आल्या. व नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आव्हान करण्यात आले आहे.. पोलीस प्रशासनास योग्य रीतीने सहकार्य करा आणि आम्ही मंडळात वेळोवेळी सहकार्य करू असेही सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी म्हटले आहे, गणेशोत्सव भक्तांची परवानगी करिता गैरसोय होऊ नये म्हणून एक खिडकी योजना लवकरच राबवू असेही आव्हान करण्यात आले आहे
यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे झोन 5 चे अभियंता, फायर बिग्रेडचे अधिकारी, व संबंधित विजापूर का पोलीस स्टेशनचे अधिकारी व गणेश उत्सव मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष व प्रमुख या कार्यक्रमास उपस्थित होते..
शासनाचे नियम व अटी
१)डॉल्बी वाद्यास परवानगी नाही
२)एम एस ई बी कडून परवानगी घेऊनच मंडळामध्ये विद्युत रोषणाई करण्यात यावी. ३)मंडळाच्या ठिकाणी प्रत्येक वेळी दोन स्वयम् सेवक असणे गरजेचे आहे.
४)मंडळाच्या मिरवणुकीमध्ये सामील होणाऱ्या वाहनाची आरटीओ ऑफिस कडून तपासणी करून तसे गाडी सुस्थितीत आहे याचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे.
५)विनापरवाना डिजिटल बोर्ड लावणार नाहीत.
६)फटाक्याची आतिशबाजी करू नये.