सोलापूर – सैनिक स्कूल सातारा, माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने शनिवार दिनांक 28 जून रोजी सायंकाळी सहा ते साडेआठ यादरम्यान सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात भारतीय सैन्य दलातील करिअरच्या संधी याविषयी व्याख्यान आयोजित केले आहे.
सैनिक स्कूल साताराचे माजी विद्यार्थी आणि भारतीय हवाई दलात 39 वर्षे उल्लेखनीय सेवा केलेले दक्षिण हवाई कमांडचे कमांडिंग इन चीफ म्हणून सेवा करत असलेले एअरमार्शल अरुण गरुड हे ‘सैनिकी सेवा एक गौरवशाली प्रवास आणि संधी’ या विषयावर बोलणार आहेत.
गोरखा रायफल्स मधील अधिकारी आणि जम्मू-काश्मीर सिक्कीम व ईशान्य भारतात लष्करी नेतृत्व करीत संयुक्त राष्ट्र शांतता मिशनमध्ये भारतीय लष्करी निरीक्षक म्हणून कार्य केलेले सेवानिवृत्त ब्रिगेडियर अरविंद कुंडलकर हे लष्करी लढाऊ नेतृत्वाच्या धड्यांची नागरी जीवनात प्रासंगिकता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सैनिक स्कूल सातारा चे माजी प्रशासकीय अधिकारी आणि माजी विद्यार्थी लेफ्टनंट कर्नल रणजीत सिंह नलावडे हे भारतीय सेनेतील तांत्रिक सेवा मधील करिअर संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
संरक्षण क्षेत्रातील करिअर संधी, शिस्त, राष्ट्रसेवा, नेतृत्वगुण जागरूक करण्यासाठी आयोजित केलेल्या या महत्त्वाच्या व्याख्यानासाठी विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेचे सोलापूर चॅप्टरचे अध्यक्ष गंगाधर थळंगे आणि रविराज गायकवाड यांनी दिली