सोलापूर-श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कै. सौ. अ. बि. उदगिरी बालक मंदिर, बालक मंदिर, कै. आ. ह.आब्बा प्राथमिक विद्यालय, चौडेश्वरी प्रशाला व सोमवार पेठ गट्टी फंड यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा सप्ताह कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
श्री सोमवार पेठ गट्टी फंड यांच्या शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संकुलातील सर्व शाखेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा महोत्सव उद्घाटन समारंभ शिक्षण संस्था अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष चिलवेरी, उद्घाटक म्हणून राज्यस्तरीय कबड्डी पंच सुभाष माने, प्रमुख अतिथी तोगटवीर क्षत्रिय समाजाचे सचिव अनिल कंदी, गट्टी फंडचे अध्यक्ष श्री मोहन पोसा, मानकरी रमेश गट्टी व सेक्रेटरी तुकाराम गट्टी,पतपेढी संचालक अरविंद पुडूर यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष चिलवेरी यांच्या शुभहस्ते सर्व मान्यवरांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. क्रीडा शपथ ल विश्वनाथ कंदी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांसमवेत घेतली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सविता यरझल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे उद्घाटक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे पंच व स्वामी विवेकानंद प्रशालेचे क्रीडा शिक्षक सुभाष माने सर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना असे सांगितले की जीवनात यशस्वी होण्यासाठी क्रीडेचे खूप महत्त्व आहे, मोबाईल बाजूला ठेवून एक तास तरी मैदानात उतरा असा संदेश त्यांनी मुलांना दिला. अरविंद पुडूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुभाष चिलवेरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या शिंपी मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अमर उदगीरी, सचिव श्रीधर चिंता, सहसचिव सतीश पेरमाळ, खजिनदार श्री विलास चिंता, सदस्य संतोष पुरुड ,संतोष उदगिरी, नागेश अकीम, व्यंकटेश रंगम,मोहन गुर्रम प्रशांत पोसा, चारही शाखेचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक वर्ग,समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन श्री दिलीप फडतरे सर व आभार श्री विश्वनाथ कंदी यांनी मानले.