येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर महानगरपालिका चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्ग व जगदंबग्रुप तर्फे नूतन विरोधीपक्षनेते अमोल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक गुरुशांत दादा धुत्तरगांवकर,नगरसेवक विनोद भोसले,सकल मराठा समन्वयक माऊली पवार उपस्थित होते.याप्रसंगी चतुर्थश्रेणी कर्मचार्यांनी त्यांच्या व्यथा आणि अडचणी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्या समोर मांडल्या.यावेळी सत्काराला उत्तर देताना कर्मचार्याच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्यानी प्रयत्न करेन असे आश्वासन विरोधी पक्षनेतेश्री अमोलबापू शिंदे यांनी दिले. यावेळी कर्मचारी वर्ग व जगदंब ग्रुपचे सदस्य गणेश डेंगळे, प्रदीप जोशी, देविदास मोहिते,गजानन जाधव,स्वामी,कोळी,प्रभुलिंग पुजारी,मेघराज साळुंके,सौरभ सांगवी,अमर गुड्डू उपस्थित होते.