सोलापूर : विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज संभाजी तलावात नागरिकांसाठी बोटींगची सेवा बुधवारी सुरू करण्यात आली.त्याचे उदघाटन पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील उपस्थित होते.महापालिकेने युनिटी लेक व्ह्यू बोट क्लबला बोटींग सेवेचा मक्ता दिला आहे.तसेच छत्रपती संभाजी महाराज तलावसाठी केंद्र सरकारच्या निधीतून तलावाची स्वच्छता, परिसर सुशोभिकरण व प्रदूषणमुक्तीसह विविध कामे टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. आता त्यात बोटींग सेवेची भर पडल्याने तलाव परिसर पर्यटनासाह नागरिकांच्या विरंगुळ्याचे केंद्र बनणार आहे. बोटींग सेवेच्या उद्घाटनावेळी माजी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेविका पूनम बनसोडे, कपिल मौलवी, जयधवल करकमकर, शहबाज काझी, शकील मौलवी, आदिल मौलवी आदी उपस्थित होते.या तलावात एकूण आठ बोटी उपलब्ध करण्यात आले आहेत. यामध्ये दोन व चार आसनक्षमतेचे 6 पायडल बोट तर चार व बारा आसन क्षमतेचे 2 बोट आहेत. पायडल बोटसाठी एका व्यक्तीला 60 रुपये तर मोटर बोटसाठी प्रति व्यक्ती 115 रुपये तिकिट दर ठेवण्यात आले आहेत. काही दुर्घटना घडल्यास मदयकार्यासाठी खास बोटीची सोय करण्यात आली आहे.