येस न्युज मराठी नेटवर्क ; सोलापुरातील प्रभाग क्रमांक ७ मधील उज्वल सोसायटी येथे नवीन ९ इंची ड्रेनेज लाईन टाकण्याचा शुभारंभ महापालिका विरोधी पक्षनेते अमोल शिंदे व नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरिकांच्या हस्ते पूजा करून संपन्न झाला. या कॉलनीमध्ये ६ इंची ड्रेनेजलाइन असल्यामुळे वारंवार ड्रेनेज चोकअप होण्याचा प्रॉब्लेम होता. मागील पंधरा वर्षांपासून हे काम रखडले होते हे काम मार्गी लागल्याबद्दल या कॉलनीतील सर्व रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.नगरसेवक अमोल शिंदे, सारिका पिसे व देवेंद्र कोठे यांच्या २०१९-२०२० सालच्या भांडवली निधीतून हे काम करण्यात येत आहे.या साठी ५.७५ लाख निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या कार्यक्रमास सतीश भोसले, प्रकाश रुईकर,मुकुंद भोसेकर,तुकाराम झिंजुर्डे,लक्ष्मण नरळे,प्रमोद झिंजुर्डे,प्रदीप झिंजुर्डे,रोहित भोसेकर,ऋषिकेश इंडिकर,अभय जोशी,राजन पोरे,ओंकार क्षिरसागर,शहाजी वडणे,अमोल कुलकर्णी,सचिन गुंड,प्रशांत गुंड शिवलिंग कटारे प्रभाग सातचे प्रतिनिधी बाबा कॉन्ट्रॅक्टर अजय राऊत ,झोन ६ अधिकारी सतीश बुर्ला,विजय मस्के,सुनील राठोड मुकेश बद्दूरकर, सचिन काशीद,राहुल गोयलसह कर्मचारी उपस्थित होते