सोलापूर- शहरात कोरोना कमी झाल्याने पुन्हा एकदा सोलापूरात “बुथ पे चर्चे” ला उधाण आले आहे. दाळगे प्लॉट मध्ये बुथ संपर्क अभियान अंतर्गत नागरीकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यात कोणतेही संकट या भागात येऊ देणार नाही. दिवाबत्ती, ओपन जिमखाना, सभामंडप, बोर मारणे, रास्ते, ड्रेनेज ही सर्व कामे लवकरच सुरू करणार अशी माहिती नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिले. दाळगे प्लॉट भागातील नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी सिद्राम देसाई, बाबुराव खेडगीकर, सिद्धाराम हिरेमठ, सिद्राम कुंभार, मल्लिनाथ लगशेट्टी, राजाभाऊ पसारे, राजाभाऊ खैरमोडे, सुधाकर मारडकर आदींची उपस्थिती होती.
कोरोना सावट असल्याने पुन्हा एकदा भवानी पेठेतील दाळगे प्लॉट येथे नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी बुथ संपर्क अभियानांतर्गत “बुथ पे चर्चा” ठेवण्यात आले होते. सभामंडपासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक कोटी निधींची मागणी केली होती. त्यामध्ये दाळगे प्लॉट मधिल सभामंडपाच्या निधीसाठी 30 लाखाची मागणी करण्यात आले होते. पण राज्यात महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर निधी परत घेण्यात आले. त्यानंतर कोरोना सावट असल्याने राज्यात निधी शिल्लक नसल्याने व नगरसेवकांनी पत्रव्यवहार करूनही निधी मिळू शकली नाही. त्यामध्ये मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने पत्रव्यवहार करूनही निधी मिळाली नाही. खासदार व आमदार यांच्या शासकीय अनुदानातून किंवा मनपाच्या निधीतून सहा महिन्यांच्या आत सभामंडपाचे वॉल कंपाउंड, वाचनालय बांधून देणार असल्याचे आश्वासन सुरेश पाटील यांनी दिले. प्रभागात दररोज नागरिकांची अनेक तक्रारी येत असून पालिका प्रशासनाच्या वतीने स्वच्छता, ड्रेनेज तक्रार, दिवाबत्ती, पाणी पुरवठा सुरळीत आहे की नाही याबद्दल अनेक नागरिकांनी विविध तक्रारी मांडले. सदर भागात काही दिवसांपूर्वी सायंकाळी लाईट जाण्याच्या तक्रारी वाढत आहे, रस्ते, पाणी, ड्रेनेज या सर्व गोष्टी नागरिकांना सोयीसुविधा लवकर उपलब्ध करून देणार आहे. आम्ही मागिल “बुथ पे चर्चा” आयोजन केल्यामुळे सर्व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत देखभाल व दुरुस्तीची ९०% कामे पूर्ण केली आहेत. तसेच येत्या सहा महिन्यात उर्वरित रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती कामे लवकरच करणार आहे अशी माहिती सुरेश पाटील यांनी दिले.
याप्रसंगी भागातील मल्लिनाथ नागमोती, मुरली कोकाटे, व्यंकटेश बच्चल, केदार पसरे, आनंद उंबरे, सोमनाथ हिरेमठ, विजापूरे, मदगुणकी व भागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नरेश मुन्नुरेड्डी, संजय जाधव, पंचाक्षरी हिरेमठ, राजु पोतदार यांनी काम पाहिले. कार्यक्रमाची प्रास्ताविक व्यंकटेश बच्चल यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधाकर माडकर यांनी केले.