• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, August 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आकाश इन्स्टीट्युटचा सोलापुरात शुभारंभ

by Yes News Marathi
December 3, 2020
in इतर घडामोडी
0
आकाश इन्स्टीट्युटचा सोलापुरात शुभारंभ
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, (प्रतिनिधी):- मेडिकल, इंजिनिअरींगच्या प्रवेश परिक्षा तसेच विविध प्रकारच्या राष्ट्रीय स्पर्धा परिक्षांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कोचिंग क्लास  असणाऱ्या आकाश एज्युकेशन लिमिटेडने देशभरात नावलौकीक प्राप्त केले आहे. लाखों विद्यार्थ्यांनी आकाशच्या कोचिंगक्लास चा लाभ उठवत आपले करिअर घडवले आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही आपले विज्ञान शाखेतील करीअर घडवण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आकाश इन्स्टीट्युटचा सोलापूर शहरात गुरूवार दि. 3 डिसेंबर पासून शुभारंभ करण्यात आला असल्याची माहिती संचालक अजय बहादुर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता शुभारंभाचा कार्यक्रम करण्यात आला असेही यावेळी सांगण्यात आले.

सन 1988 मध्ये महान दूरदृष्टी असलेले प्रतिभावंत  प्राध्यापक  जे.सी.चौधरी यांनी आकाश एज्युकेशनल सिर्व्हिसेस लिमिटेडची स्थापना केली. 32 वर्षापासून संपूर्ण देशभरातील 200 पेक्षा अधिक केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी 2 लाख 50 हजार विद्यार्थी मेडिकल, इंजिनिअर, KVPY, NTSE,OLYMPIAD सारख्या शिष्यवृत्तीच्या परिक्षामधून आपली गुणवत्ता सिध्द केली आहे. या गुणवत्तेवरच देशभरातील जवळपास 25 कोचिंग क्लास  मध्ये आकाश पहिल्या क्रमांकावर असल्याचा सर्व्हे इंडिया टुडे ने जाहिर केले आहे. सन 2016 पासूनच आकाशने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आकाश लाईव्ह च्या माध्यमातून ई लर्निंग ची सुविधा उपलब्ध करून दिली होती ती सध्याच्या कोरोनाच्या महामारीत विद्यार्थ्यांना वरदान ठरलेली आहे. त्याचबरोबर आकाशच्या वतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून कोचिंग क्लास सुरू आहेत कारण विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले नाही पाहिजे हाच हेतु आकाशचा आहे.

विद्यार्थींच केंद्रबिंदू…
आकाश इन्स्टीट्युटची स्थापना करणारे प्रतिभावंत प्राध्यापक जे.सी. चौधरी सर यांनी अजय बहादुर सिंह यांच्याकडे आकाशची जबाबदारी दिल्यानंतर गेल्या 16 वर्षापासून आपल्या नेतृत्व कौशल्याने अजय बहादुर सिंह यांनी देशातील AIIMS  मध्ये AIR-1 आणि JIPMER मध्ये AIR-1 ,NEETमध्ये AIR2, तसेच इंजिनिअरींगमध्ये उच्च श्रेणीचे निकाल लागलेले आहेत. अजय बहादुर सिंह हे स्वत: एक प्रेरणादायी वक्ते असून त्यांंच्यामुळे अनेकांना त्याचा लाभ झाला आहे.
सन 2004 मध्ये रांची येथून अजय बहादुर सिंह हे आकाश इन्स्टीट्युटशी जोडले गेेले त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाने आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने मोठी झेप घेतली त्यांनी दुसऱ्याच वर्षी भुवनेश्वर मध्ये आकाश इन्स्टीट्युटची शाखा सुरू केली. मोठ्या शिक्षण स्पर्धेतही सर्वश्रेष्ठ गुणवत्ता टिकवून ठेवत राज्य तसेच देशात सर्वोत्कृष्ठ डॉक्टर  आणि इंजिनिअर तयार करून ओरिसाच्या इतिहासामध्ये त्यांनी उच्चतम कामगिरी केली. कौशल्यपूर्ण कामगिरीचा आलेख उंचावत भुवनेश्वर केंद्राने सन 2009, 2011 या वर्षात आकाशच्या सर्व केंद्रात सर्वश्रेष्ठ केंद्राचा किताब पटकावला आहे.भुवनेश्वर मध्ये 2 केंद्र तसेच कटक, पूर्व दिल्ली, आयोध्या येथे यशस्वीपणे आकाश इन्स्टीट्युटचे केंद्र सुरू आहेत. अशीच यशाची चढती कमान ठेवून आता महाराष्ट्रातही आकाश इन्स्टीट्युटने नागपूर, नांदेड, लातूर नंतर आता सोलापूरमध्ये गुरूवार दि. 3 डिसेंबर रोजी शुभारंभ केला. अजय बहादुर सिंह यांच्या उत्कृष्ठ नेतृत्वाखाली सोलापूरची आकाशची शाखाही सर्वोत्तम कामगिरी करीत सोलापूरमधील विद्यार्थ्यांना डॉक्टर , इंजिनिअर करून विविध शिष्यवृत्ती परिक्षांमध्येही अव्वल आणणार आहे. सोलापूरच्या विद्यार्थ्यांना आकाशच्या रुपाने करीअरची चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे सोलापूरमधील विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करून देण्यासाठी आकाश इन्स्टीट्युट सोलापूर केंद्र संपूर्णपणे प्रयत्नशील राहून आपली गुणवत्ता सिध्द करेल आणि देशभरातील आकाश इन्स्टीट्युटच्या केंद्रात सोलापूर केंद्र सर्वोत्कृष्ठ केंद्र ठरेल अशी अपेक्षा असल्याचेही सांगण्यात आले. सोलापूरमध्ये आकाश इन्स्टीट्युटने डॉक्टर , इंजिनिअर तसेच राष्ट्रीय स्पर्धा परिक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी आपल्या अत्याधुनिक सोई सुविधा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या पत्रकार परिषदेला विजय बहादुर सिंह, शुभाजित ठाकुरे, मृत्युंजयकुमार सिंह, उमेश घाडगे, प्रदीप साहू, दिपक कुमार आदी उपस्थित होते.

Previous Post

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत

Next Post

करोनावर मुख्यमंत्र्यांचा इतका अभ्यास झाला की ते अर्धे डॉक्टर झालेत- अजित पवार

Next Post
करोनावर मुख्यमंत्र्यांचा इतका अभ्यास झाला की ते अर्धे डॉक्टर झालेत- अजित पवार

करोनावर मुख्यमंत्र्यांचा इतका अभ्यास झाला की ते अर्धे डॉक्टर झालेत- अजित पवार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group