प्रयास मागासवर्गीय बहुद्देशिय संस्थेचा अभिनव उपक्रम
सोलापूर : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला आर्दश संविधान दिले आहे त्यामुळे विविधता असूनही आपला देश एक संघ आहे. देशाला एक संघ ठेवणे भारतीय संविधानामुळे शक्य झाले आहे.स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य, असे अनेक बाबी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट आहे तरी भारतीय संविधान बाबतची सखोल माहिती सर्वसामान्यांना व्हावी याकरिता प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भारतीय संविधानाचा 75 वा अमृत महोत्सव वर्ष निमित्त रावजी सखाराम हायस्कूल ऑफ कॉमर्स सोलापूर येथे भारतीय संविधान प्रास्ताविकेचे अनावरण प्रथम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाचे सुलोचना सोनवणे मॅडम व प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला
सदर भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.यावेळी रावजी सखाराम हायस्कूल ऑफ कॉमर्स प्राचार्य मा.संतोष वालवडकर सर यांची प्रमुख उपस्थित होती. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाचे मा.सुलोचना सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना प्रयास संस्थेच्या कार्याचे व या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशिक बनसोडे हर्षद मेहर निलेश सोनवणे पारस कुमठेकर राहुल वडखिले तसेच शाळेतील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.