सोलापूर : शेळगी येथील लक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या संदीप रामानुज खंडेवाल यांच्या घरामध्ये प्रवेश करून अज्ञात चोरट्याने लोखंडी कपाटातील २,४२,००० रुपयांचे दागिने पळविले आहेत. शेजारी राहणाऱ्या संगीता राजेश शर्मा यांच्या घरांमधून ५८ हजारांचे दागिने चोरीस गेल्याची फिर्याद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस सब इन्स्पेक्टर दाईंगडे अधिक तपास करीत आहेत.