No Result
View All Result
विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणार
- सोलापूर – अखिल भारतीय विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंह हे शनिवारी (दि.११) सोलापूरात येत आहेत. दुपारी एक वाजता शिंदे चौक येथील शिवस्मारक सभागृहात सोलापूर विद्यापीठ आणि शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत.
- राज्य शासनाकडे प्रलंबित ६ मागण्यासाठी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे २ फेब्रुवारीपासून बारावी बोर्ड व विद्यापीठ परीक्षावरील बहिष्कार आंदोलन सुरू आहे. १६ फेब्रुवारीला एक दिवसाचा लाक्षणिक संप आणि २० फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलनास सुरुवात होणार आहे. यासाठी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय सेवक संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी दौऱ्यावर आहेत. यात डॉ. सिंह यांच्याबरोबरच राजा बढे, रावसाहेब त्रिभुवन, प्रकाश म्हसे, राजेंद्र गोटे, सोमनाथ सोनकांबळे, माधव राऊळ व दिलीप पवार आदींचा समावेश आहे.
- तरी विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयुक्त कृती समितीच्या वतीने सोलापूर विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात व सरचिटणीस रविकांत हुक्कीरे, कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले व सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभिजित जाधव व सचिव भीमा मस्के यांनी केले आहे.
No Result
View All Result