येस न्युज मराठी नेटवर्क : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस व लोकप्रिय कामगार नेते रमाकांत गणेश उर्फ र. ग. कर्णिक यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९१ वर्षांचे होते. कर्णिक यांच्या निधनामुळं आधारवड हरपल्याची भावना कामगार क्षेत्रात व्यक्त होत आहे.