कर्नाटक : सुरवातीच्या कलांनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यापाठोपाठ भाजप आणि जेडीएस यांचा क्रमांक आहे. कलांमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला असला तरी स्थिर सरकारसाठी काँग्रेसला जेडीएसची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरु केल्या आहेत. दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्व देखील जेडीएसचे प्रमुख एचडी कुमारस्वामी यांच्या संपर्कात असून बोलणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जेडीएस या निवडणुकीत किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
माझा पक्ष छोटा : एचडी कुमारस्वामी
जेडीएस प्रमुख एचडी कुमारस्वामी यांनी आज (13 मे) निवडणूक निकालापूर्वी पत्रकारांना सांगितलं की, आम्हाला चांगल्या गोष्टींची अपेक्षा आहे. माझी कोणतीही मागणी नाही, माझा पक्ष छोटा आहे, मी मागणी कशी करु शकतो? त्याचवेळी, जेडीएस पक्षाच्या एक्झिट पोलमध्ये 30 ते 40 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, जेडीएसने मागीन निवडणकीत एकूण 37 जागा जिंकल्या होत्या. निकालात तो तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता.