सरचिटणीसपदी संजय पवार, खजिनदारपदी अजित सांगवे
सोलापूर : सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण (दैनिक पुण्यनगरी) , उपाध्यक्षपदी शिवाजी सुरवसे (येस एस न्यूज मराठी ) तर सरचिटणीसपदी संजय पवार (दैनिक राजस्व) यांची पुढील २०२४-२५ वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच खजिनदारपदी अजित सांगवे, यांची निवड करण्यात आली.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी श्रमिक पत्रकार संघाच्या परिषद कक्षात ज्येष्ठ सदस्य चंद्रशेखर कव्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. संघाच्या सहचिटणीसपदी राहुल रणदिवे (दैनिक जनमत) हे निवडले गेले. सर्व निवडी एकमताने झाल्या. निवडण्यात आलेले नूतन कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे : श्रीकांत कांबळे (दैनिक दिव्य मराठी), डॉ. समीर इनामदार (दैनिक लोकमत), रामेश्वर विभूते (दैनिक सकाळ), भगवान परळीकर (दैनिक सामना), जाकीरहुसेन पिरजादे (दैनिक पुढारी) आणि रोहन नंदाने (दैनिक सुराज्य). यांची निवड करण्यात आली.
या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर झाले. या सभेस ॲड. आशुतोष पाटील, ॲड शिवानी बिराजदार ॲड. आकाश अनिल प्याटी, ज्येष्ठ पत्रकार संजीव पिंपरकर, शांतकुमार मोरे, गिरीश गोरे, अभय दिवाणजी, शंकर जाधव, दशरथ वडतिले, एजाज हुसेन मुजावर, पुरुषोत्तम कुलकर्णी, प्रशांत माने, मनोज व्हटकर ,यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचा सभेचे अध्यक्ष चंद्रशेखर कव्हेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.