सोलापूर – तीन जानेवारीला नमन करू क्रांतीज्योतीला मान मिळाला बालिका दिनाचा. सावित्री बाईंच्या जन्मदिणाला येथील रोटरी नॉर्थ राधा किशन फोमारा मूकबधिर विद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केले.
कार्यक्रमास लाभलेल्या प्रमुख पाहुण्या रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ च्या अध्यक्षा रोटे डॉ.जानवी माखिजा आणि शाळेचे सचिव रोटे सुनील दावडा यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी स्वाती भंडारी या विद्यार्थिनीने आपले विचार भाषणातून व्यक्त केले. तीन जानेवारी हा दिवस सावित्री बाईंचा जन्मदिवस – बालिका दिंन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने शाळेतील बालिकांना शालेय साहित्य देण्यात आले.या कार्यक्रमास रोटे, सुनील दावडा, दौलत सीताफळे, श्री पावडे, रेणुका पसपुळे, संध्या चंदनशिवे, विजया पितालकर, योगिता बोधले,गजानन गडगे, नागनाथ बासाते ,सोमनाथ ठाकर, दिनेश ताटे,सकलेन बडे खान आनंद पारेकर, विठ्ठल सातपुते, चिदानंद बेनुरे, गंगाधर मद भावी, अजित पाटील, साहेब गौडा पाटील, सोमनाथ थोरात बाबासाहेब पवार, शनाना शेख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार गंगाधर मदभावी यांनी मानले.