सोलापूर:- 16 जानेवारी 20२१ पासून देशभरात कोविड-19 लसीकरण करण्यास सुरुवात झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील आज आखेर १८ हजार १२२ जणांचे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण झाले आहे. कोरोना रुग्णामध्ये होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे. त्याकरिता लसीकरणा द्वारे सर्वांना सुरक्षित करणे यासाठी कोविड-19 ची लस घेणे ही महत्त्वाची पायरी आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त पी. पी. शिवशंकर,पोलीस आयुक्त अंकुश शिंदे ,ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते व उपसंचालक आरोग्यसेवा पुणे मंडळ पुणे डॅा.संजय देशमुख तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितल कुमार जाधव व जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.प्रदीप ढेले यांच्या संकल्पनेतून आज बैठकीत एकाच दिवशी दहा हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचा नियोजन शुक्रवार दि.12/02/2021 रोजी 53 आरोग्य संस्थामध्ये लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलेली आहेत.
जिल्हयामध्ये लसीकरणा संदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये लस न घेतलेले शासकीय व खाजगी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर ज्यामध्ये पोलीस, महसूल, पंचायत समितीकडील अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, महापालिका कर्मचारी,नगरपरिषद कडील कर्मचारी यांचा या दिवशी लसीकरणा मध्ये समावेश असून अद्याप अशी 36636 जणांचे लसीकरण होणे बाकी आहे याचाच पहिला टप्पा म्हणून एकाच दिवशी म्हणजे दिनांक 12 फेब्रुवारी रोजी संपूर्ण जिल्हाभर एक चळवळ म्हणून लसीकरण करण्यात येणार असून अशा प्रकारची ही राज्यातील पहिलीच मोहीम आहे. यासाठीची आवश्यक कोविड-19 लस जिल्हयास प्राप्त झालेली आहे असे डॉ.अनिरुध्द पिपंळे, जिल्हा लसीकरण अधिकारी यांनी सांगितले आहे. याद्वारे कोविड लसीकरणाचा पहिला डोस सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करून /पडताळणी करुन देण्यात येणार आहे. सदर लस सुरक्षित असून सर्वानी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी व मनपा आयुक्त यांनी केले आहे.
सदर लसीकरणाचे शिबीराचे ठिकाण खालील प्रमाणे आहेत.
क्र. तालुक्याचे नांव अ.क्रं. आरोग्य संस्था
१. अक्कलकोट 1 प्रा आ.केन्द्र शिरवळ
2 ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट
3 बंदिछोडे हॉस्पिटल
२. बार्शी 4 ग्रामीण रुग्णालय बार्शी
5 NUHM बार्शी
6 बकरे हॉस्पिटल
7 सुश्रुत हॉस्पिटल
8 चौधरी हॉस्पिटल
9 प्रा आ.केन्द्र वैराग
10 ग्रामीण रुग्णालय पांगरी
३. करमाळा 11 उपजिल्हा रुग्णालय करमाळा
12 प्रा आ.केन्द्र जेऊर
४. माढा 13 ग्रामीण रुग्णालय माढा
14 ग्रामीण रुग्णालय कुर्डूवाडी
15 प्रा आ.केन्द्र मोडनिंब
16 प्रा आ.केन्द्र टेर्णी
5 मोहोळ 17 प्रा आ.केन्द्र कामती
18 गोळवलकर हॉस्पिटल
19 झाडबुके हॅास्पिटल
20 ग्रामीण रुग्णालय मोहोळ
६ माळशिरस 21 उपजिल्हा रुग्णालय अकलुज
22 अश्विनी हॉस्पिटल नातेपूते
23 ग्रामीण रुग्णालय माळशिरस
24 राणे हॉस्पिटल अकलुज
25 श्रेयस हॉस्पिटल श्रीपूर
26 प्रा आ.केन्द्र वेळापूर
७ मंगळवेढा 27 ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा
28 महिला हॉस्पिटल मंगळवेढा
८ पंढरपूर 29 उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर
30 लाईफलाईन हॉस्पिटल पंढरपूर
31 अपेक्स हॉस्पिटल पंढरपूर
32 ग्रामीण रुग्णालय करकंब
33 विठठल हॉस्पिटल पंढरपूर
34 प्रा आ.केन्द्र गादेगांव
35 प्रा आ.केन्द्र कासेगाव
९ सांगोला 36 ग्रामीण रुग्णालय सांगोला
37 दक्षता हॉस्पिटल सांगोला
38 बाबर हॉस्पिटल सांगोला
१० सोलापुर मनपा 39 मजरेवाडी UPHC
40 सोरेगाव, UPHC
41 रामवाडी UPHC
42 देगाव UPHC
43 जोडभावी पेठ UPHC
44 विडीघरकूल (हैद्राबादरोड
45 मुद्रा सनसिटी UPHC
46 भावनारुशी UPHC
47 मदरटेरेसा पॉलरक्लीनीक UPHC
48 एसआरपी कॅम्प
49 पोलीस हेडक्वॉटर,
50 सिध्देश्वर हॉस्पिटल सोलापूर
51 यशोधरा हॉस्पिटल सोलापूर
52 मोनार्क हॉस्पिटल सोलापूर
53 धनराज गिरजी हॉस्पिटल सोलापूर
54 ग्रामीण रूग्णालय मंद्रुप द सोलापूर
55 अश्विनी ग्रामीण रूग्णालय कुभांरी द सोलापूर
56प्राथमिक आरोग्य केंद्र कोंडी उ सोलापूर