सोलापूर : कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गेलेल्या लोकांमध्ये पुन्हा वाद होऊन चंद्रकांत महादेव वाघमारे यांच्यावर चाकूने वार करण्यात आला. मल्लिकार्जुन नगर येथील वेलकम हॉलजवळ हा प्रकार ९ जून रोजी सकाळी अकरा वाजता घडला आहे . चंद्रकांत वाघमारे यांनी या भांडणाबाबत सचिन वाघमारे , प्रवीण वाघमारे आणि देविदास व स्वामी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे . याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस सबइन्स्पेक्टर मुरकुटे तपास करीत आहेत.