येस न्युज मराठी नेटवर्क : कृषिभूषण दत्तात्रेय नानासाहेब काळे यांनी उत्पादन केलेल्या किंगबेरी या नव्या द्राक्ष वाणाचा 13 फेब्रुवारी रोजी शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा नान्नज येथे आयोजित केला असल्याचे कृषिभूषण दत्तात्रय काळे यांनी मंगळवारी सांगितले. किंगबेरी या नवीन द्राक्ष वाण याची वैशिष्ट्ये सांगताना काळे म्हणाले, या नवीन वाणाची पाने अत्यंत मऊशार असल्यामुळे फळधारणा उत्तम होते प्रत्येक काडीला दोन ते तीन घड लागतात. काडी पासून गडाचा देठ लांब आहे. एकरी 12 ते 14 टन उत्पन्न होते आणि सर्व द्राक्ष मणी एकसारखे असतात त्याची लांबी 45 ते 50 मिलिमीटर व जाडी 24 ते 25 किलोमीटर आहे.