किम कार्दशियनने मेट गाला 2021 मध्ये तिच्या अनोख्या ड्रेसने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे . तिने यावेळी काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता ज्यात तिचा चेहरासुद्धा पूर्णपणे झाकलेला होता.

जस्टिन बीबर पत्नी हॅली बीबरसह या कार्यक्रमाला पोहोचला होता. यादरम्यान दोघही काळ्या रंगाच्या पोशाखात दिसले. शॉन त्याचे अब्सची झलक दाखवताना दिसला. दुसरीकडे, कॅमिला कॅबेलो जांभळ्या रंगाच्या पोशाखात खूप सुंदर दिसत होती.
जिजी हदीद आई झाल्यानंतर पहिल्यांदाच मेट गालामध्ये दिसली. ऑफ व्हाइट गाऊनमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत होती.
लिल नॅक्स एक्स संपूर्ण गोल्डन ड्रेसमध्ये दिसला. बिली आयलीश इव्हेंटमध्ये एक मोठा पीच रंगाचा गाऊन परिधान करून आली होती.
गेम्स ऑफ थ्रोन्स अभिनेत्री मैसी विल्यम्स काळ्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती.जेनिफर लोपेझने एखाद्या राणीप्रमाणे मेट गालामध्ये प्रवेश केला.