सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय दूतावास व आर्ट््स क्राफ्ट गॅलरी, दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत भारतीय चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजिले गेले. यात सोलापूरचे चित्रकार रामचंद्र खरटमल यांच्याही चित्राचा समावेश होता.
भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे या संकल्पनेवर हे प्रदर्शन होते. चित्रकार रामचंद्र खरटमल यांचे ‘विजय दिवस’ या विषयावरील चित्र प्रदर्शनात झळकले. १९७१ भारत-पाक युद्धावर आधारित हे चित्र आहे. जे भारताच्या तीनही दलाची शौर्यगाथा सांगणारे आहे. हा आपला स्वातंत्र्य भारताचा पहिला संपूर्ण विजय होता. या घटनेेने जगात भारताची मान उंचावली. जगाला तेव्हा पहिल्यांदा दाखवून दिले, स्वतंत्र भारत काय करू शकतो ते. अशा आशयाचे चित्र भारतीय दूतावास अबू, दुबई येथे सन्मानाने प्रदर्शित झाले आहे.