येस न्युज मराठी नेटवर्क : दौंडमध्ये वयाच्या अवघ्या 21 वर्षी तरुणीने सरपंचपद पटकावले आहे.दौंड तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्नेहल संजय काळभोर यांची वयाच्या 21 व्या वर्षी बिनविरोध सरपंचपदी निवड करण्यात आली आहे.गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन स्नेहल यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा विचार पक्का केला होता. स्नेहल यांनी गावात जोरदार प्रचार करत एकच धुरळा उडवून दिला होता. गावातील लोकांनीही तरुण आणि अभ्यास उमेदवार पाहून भरघोस मतदान केले आणि स्नेहल यांना विजयी केलं. ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर सरपंचपदाची निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली आणि स्नेहल यांच्या नावाची घोषणा झाली. वयाच्या 21 वर्षी स्नेहल सरपंच झाल्यामुळे काळभोर कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला असून आनंदोत्सव साजरा केला आहे.