येस न्युज नेटवर्क : ‘KGF Chapter 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुम्कौल घालत आहे. चित्रपटाचं यश पाहून चाहते आनंदी झाले आहेत. मात्र, आता ‘केजीएफ 2’ चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आली आहे. ‘केजीएफ 2’ फेम अभिनेता मोहन जुनेजा यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यानच अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या आणि कॉमेडीने लोकांना हसवणाऱ्या मोहन यांनी आज या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे अवघ्या साऊथ इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते मोहन जुनेजा, यश स्टारर ‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ 2’ या दोन्ही चित्रपटांत झळकले होते.