येस न्युज मराठी नेटवर्क : जुना विडी घरकुल जवळ रवींद्र मच्चा यांनी बांधकामावरील पत्र्याचे शेड मारू न दिल्याने जुना राग मनात धरून प्रभाकर कोंडम, युवराज सिददम व धनंजय सिददम या तिघांनी मच्चा यांची बोटे पिरगाळून दुखापत केली आणि तोंडावर थोबाडीत मारल्याची फिर्याद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. रवींद्र मच्चा यांची पत्नी हे भांडण सोडवण्यासाठी आली असता त्यांना देखील आरोपींनी धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक भोसले अधिक तपास करीत आहेत.