सोलापूर – सोलापूर जिल्हयात जलजीवन मिशन च्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर निघी उपलब्ध करून देणेत येत आहे. ठेकेदारां मार्फत कामाचा दर्जा चांगला ठेवा. अशा सुचना पालमंत्री राज्यातले महसुल, दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशन च्या कामाचा आढावा बैठक लक्ष्मी विष्णु मिल कपौंड मधील आत्मा व कृषी विभाग अंतर्गत कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी घेणेत आली. या बैठकीस आमदार सुभाष देशमुख, आमदार संजय मामा शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त शितल उगले- तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड उपस्थित होते.
जलजीवन मिशन च्या कामात अनियमितता झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.अशा स्थितीत केंद्र शासनाची महत्वकांक्षी असलेल्या या योजनेची चांगली अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. सघ्या पाईपचा दर्जा चांगला नसलेबाबत आमदार यांचे तक्रारी आहेत. याबाबत पाईप चांगले दर्जाचे वापरा. निविदा प्रक्रिया राबविताना ठेकेदारांना झुकते माप देऊन नियम वापरणेत आले याचा सविस्तर आढावा पुढच्या बैठकीत घेणेत येईल असाही स्पष्ट सुचना पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या. जी कामे सुरू होणार आहेत ती आता पासूनच चांगल्या दर्जाची होतील या कडे लक्ष द्या. स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन काम करा. असेही त्यांनी सांगितले.
आमदार सुभाष देशमुख यांनी निविदा प्रक्रिया राबविताना अनियमितता केली असल्याचे सांगितले. जे ठेकेदार नियमित काम करीत नाहीत अशा ठेकेदारांबाबत तक्रार असूनही कामे देणेत आली. संबंधित ठेकेदार यांचे निविदा मंजूर करणेत आल्या. याबाबत आक्षेप असल्याचे सांगितले. आमदार संजय शिंदे यांनी चार वर्षातील पाणी पुरवठा व बांधकाम विभागातील अपुर्ण कामे ठेवणारे ठेकेदार यांचेवर कारवाई करा. त्याना पुन्हा कामे देऊ नका. यामुळे योजनेवर परिणाम होत असल्याचे सांगितले.
आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले, योजना राबविताना खुप घाई केली जात आहे. यामुळे योजनेवर परिणाम होत आहे. अती घाई केलेमुळे कामात अनियमितता होत आहे. या योजने साठी वेळे देणेची आवश्यकता आहे. पाईपचा दर्जा चांगला नाही. एमजेपी ने मान्यता दिली असली तरी गुणवत्ता पाहूनच पाईप खरेदी करा. ठेकेदारांववर नियंत्रण ठेवा असे सांगितले. आमदार समाधान आवताडे यांनी ज्या ठेकेदार यांनी दोन पेक्षा कामे अपुर्ण ठेवली आहेत त्यांनी पुढील निविदा प्रक्रियेत अपात्र करा. त्यांनी घालून दिलेली मर्यादा लक्षात घेऊन पात्र ठेकेदार यांची यादी तयार करा. काळ्या यादीत टाकलेले ठेकेदार यांची देखील माहिती सादर करा अशा सुचना केल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी जलजीवन मिशन च्या कामांची माहिती दिली. ८६२ गावांसाठी ८५५ योजना आहेत. कामाचा दर्जा चांगला ठेवणेसाठी त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करणेत येत आहे. कामाचे गुणवत्तेत हायगय केली जाणार नाही . जिल्हा परिषद स्तरावर चांगले पाईप पुरवठा करणारे कंपनी ची यादी तयार करणेत येत आहेत. चांगली कामे करून घेणेत येतील असेही सिईओ कोहिनकर यांनी सांगितले.
कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी
जलजीवन मिशन च्या कामात दर्जा ठेवणे साठी सनियंत्रण करणेत येत आहे. एमजेपी कडून व शासनाने दिलेले सुचनांचे पालन करणेत येत आहे. जिल्ह्यात २३१ अधिकृत ठेकेदार आहेत. निविदा क्षमता शासनाने पाच पट करा अशा सुचना दिलमुळे एका पेक्षादारांना कामे देणेत आली आहेत. ठेकेदारांनी दोन पेक्षा अधिक कामे प्रलंबित व अपुर्ण ठेवली आहेत त्यांची यादी तयार करणेत येत आहे. ठेकेदार यांना जरी निविदा मंजुर झाली तर खरेच त्यंाची क्षमता आहे का हे पाहणेत येत असल्याचे सांगून पाईप चांगले दर्जाचे वापरणेत येत असून लोकप्रतिनिधीवा विश्वासात घेऊनच कामे पुर्ण करणेत येत असल्याचे सांगितले.
बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संजय माळी यांनी चौकशी अहवालातील बाबी पालकमंत्री यांचे समोर सादर केले.