• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 21, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

‘कट्यार काळजात घुसली’… अभिवाचन व‌ गायनातून मिळाली नाटकाची अनुभूती..

by Yes News Marathi
January 20, 2025
in इतर घडामोडी
0
‘कट्यार काळजात घुसली’… अभिवाचन व‌ गायनातून मिळाली नाटकाची अनुभूती..
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – कै. सिद्धा पाटील स्मृती पुरस्कार समिती व नाट्य आराधना सोलापूर आयोजित, अश्विनी नाट्यमंदिर निर्मित कट्यार काळजात घुसली या नाटकाचे अभिवाचन व त्यातील नाट्यगीतांचे गायन यातून रसिकांना नाटक पाहिल्याची अनुभूती मिळाली. प्रभाकर पणशीकर यांच्यासारखे निर्माते,पुरुषोत्तम दारव्हेकर यांची लेखणी, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत‌ या त्रिमूर्तीमुळे रसिकांच्या मनावर गेली ५० वर्षे अधिराज्य करणारी कलाकृती म्हणून कट्यार काळजात घुसली हे संगीतनाटक अजरामर आहे. यातील क्लिष्ट परंतु अत्यंत श्रवणीय अशा शास्त्रीय संगीतातील रचनांचे गायन आणि कथानक पुढे नेणारे संवाद अशी दुहेरी कामगिरी गायक वादक आणि नाट्यकलावंतांनी तन्मयतेने केली आणि कट्यार सारख्या अजरामर नाटकाच्या अनुभूतीने‌ रसिक भारावले.

नाट्यकलावंत मंदार काळे, सुहास मार्डीकर, प्रांजली मार्डीकर, ममता बोल्ली आणि अमृत ढगे यांनी अभिवाचन केले तर शास्त्रीय संगीताची बाजू सांभाळताना
गायक दीपक कलढोणे, संध्या जोशी, शिरीष बोकील‌ यांनी हे जगदीश, ही नांदी, मुलतानी ते भैरवी ‌ही रागमाला‌,
तसेच तेजोनिधी लोहगोल, सुरत पिया की न छीन‌ बिसराई, घेई छंद मकरंद, लागी कलेजवा कटार अशा सुरस नाट्यपदांचे बहारदार गायन केले. ‌ हार्मोनियम संतोष कुलकर्णी, व्हायोलीन जयंत जोशी, तबला गणेश दाते या कलावंतांची रंगतदार साथसंगतीने कार्यक्रमाची उंची वाढत गेली. या संपूर्ण कार्यक्रमाचे कुशल दिग्दर्शन शोभा बोल्ली यांनी केले. संगीत, साहित्य, नाट्य, विधी, वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर श्रोत्यांनी सभागृह फुलले होते.‌ राजशेखर शिवदारे, नाट्य व्यवस्थापक विजय साळुंखे, डॉक्टर मुकुंद राय, एडवोकेट जेजे कुलकर्णी, पद्माकर कुलकर्णी, डॉक्टर सुहास पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते इंजिनीयर रवींद्र मोकाशी आणि वैद्यकीय क्षेत्रातले प्रसिद्ध बोलतज्ञ डॉक्टर विकास किरपेकर यांना ज्येष्ठविधीज्ञ विजय मराठे यांचे हस्ते सिद्धा पाटील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सत्कार मूर्तींची समयोचित भाषणे झाली. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती बापट यांनी केले.‌ व्यासपीठावर उद्योगपती दत्ताअण्णा सुरवसे, ॲडव्होकेट रेवणसिद्ध पाटील, अमित पाटील, उमेश पाटील, आणि पाटील परिवार सदस्य उपस्थित होते.

Previous Post

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी आशीर्वाद

Next Post

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला जन्मठेप…

Next Post
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला जन्मठेप…

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला जन्मठेप...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group