कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही जागा लढविण्याठी पक्षातून उमेदवारी मिळण्यासाठी अनेकांची रस्सीखेच सुरू आहे. असे असतानाच ही पोटनिवडणूक लढविण्याठी आत्तापर्यंत तब्बल 90 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.
अद्याप कोणत्याच राजकीय पक्षाने आपला अधिकृत उमेदवार घोषित केलेला नाही. त्यामुळे या पोटनिवडणुकीचे वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. खरं तर ही पोटनिवडणूक असूनही तब्बल 90 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एका जागेसाठी तब्बल 90 जण इच्छुक असल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपला अधिकृत उमेदवार घोषित करण्याच्या हालचाली करत आहे. तर आज भाजप आपला अधिकृत उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसही या जागेबाबत आज निर्णय घेण्याची शक्यता आहे.
तसेच शुक्रवारी रात्री (दि.3) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक टिळक कुटुंबियांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, येथील उमेदवारीबाबत काही चर्चा झाली का? असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक मनसेही लढण्याच्या तयारीत आहे. तसेच 90 जणांनी आत्तापर्यंत उमेदवारी अर्ज नेल्यामुळे या निवडणुकीची रंगत अधिक वाढणार आहे.