येस न्युज मराठी नेटवर्क ; दिल्ली येथील संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला. या चित्ररथावर सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुले व प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला. कास पठाराचा चित्ररथात समावेश झाल्याने सातार्यासाठी ही बाब भूषणावह ठरली आहे.
महाराष्ट्राच्या चित्ररथावर पाच “जैवविविधता मानकं” आहेत, ज्यात राज्यासाठी अद्वितीय असलेल्या वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश आहे. सुमारे 15 प्राणी आणि 22 वनस्पती आणि फुले या चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आली.