• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, September 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

by Yes News Marathi
January 13, 2025
in इतर घडामोडी
0
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दि .13 (जिमाका)- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजूर अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना 2 एकर बागायत किंवा 4 एकर जिराईत जमीन 100 टक्के अनुदान स्वरुपात खरेदी करुन देण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिली आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसुचित जातीचा दारिद्र्य रेषेखालील व कुटुंब प्रमुखाचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे. अशा कुटुंबातील 60 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या कुटुंबा प्रमुखाच्या पत्नीला या योजनेचा लाभ घेता येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी विक्रिसाठी जमीन उपलब्ध असलेल्या गावाचा रहिवाशी असावा. प्रस्तुत योजनेंतर्गत ज्या गावात जमीन उपलब्ध आहे त्याच गावातील पात्र लाभार्थ्यांची प्रथम निवड करण्यात येईल व त्या गावातील लाभार्थी उपलब्ध नसल्यास लगतच्या इतर गावातील पात्र लाभार्थ्यांना जमीनीच्या उपलब्धतेनुसार चिठ्या टाकून जिल्हा समितीच्या मान्यतेने विहित कार्यपध्दती नुसार पारदर्शक पध्दतीने लाभ देण्यात येईल.

दारिद्र् रेषेखालील भूमीहिन अनुसुचित जाती तथा नवबौध्द प्रवर्गातील परित्यक्ता स्त्रिया , दारिद्र् रेषेखालील भूमीहिन अनुसुचित जाती तथा नवबौध्द विधवा स्त्रिया , अनुसुचित जाती /जमाती कायद्यांतर्गत जातीचे आत्याचारग्रस्त या घटकांना लाभार्थी निवडीमध्ये प्राधान्य देण्यात येईल. महसुल विभागाने गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केलेल्या कुटुंबांना लाभ अनुज्ञेय नाही. या योजनेंतर्गत जमीनीचे वाटप झाल्यानंतर संबंधित लाभ धारकाने स्वता: जमीन कसणे आवश्यक आहे. सदर जमीनीचे अन्य व्यक्तीस, संस्थेस हस्तांतरण व विक्री करता येणार नाही तसेच लीजवर भाडेपट्याने देता येणार नाही.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना लाभ देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयास जमीन खरेदी करावयाची आहे. जमीन कसण्यास अयोग्य, डोंगर उताराची, खडकाळ व नदी पात्रा जवळच्या क्षारयुक्त व क्षारपड जमीन असू नये. जमीन सलग असावी, शेत जमीन विना बोजा व कुळ नसलेली असावी तसेच जमीन कोठेही गहाण अथवा वादग्रस्त नसावी.

जमीन विक्रीच्या अर्जावर शेतजमीन विक्री करणाऱ्या जमीन मालकाशिवाय संबंधिताच्या कुटुंबातील दोन व्यक्तींची जमीन विक्रीस संमतीबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. जे जमीन मालक जिरायत जमीन कमाल 5 लाख रुपये प्रती एकर व बागायत जमीन कमाल 8 लाख रुपये प्रती एकर प्रमाणे विक्री करण्यास तयार आहेत अशा जमीन मालकांनी जमीनीच्या 7/12 व आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त् समाज कल्याण, कार्यालय, सोलापूर यांचेशी संपर्क साधावा.

तसेच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसुचित जाती नवबौध्द घटकातील पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त समाज कल्याण सोलापूर यांच्या कार्यालयाकडे दाखल असे आवाहनही समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.

Previous Post

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

Next Post

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 26 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 26 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 26 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group