सोलापूर दि.१० :- कला ही आनंददायी असते त्यामुळे कलेने माणसाचे जीवन आनंदी होते. म्हणून कलेमुळे जीवन सार्थकी होते असे मत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक राजीव मराठे यांनी केले.
शनिवार रोजी हुतात्मा बागेत शरद बँके तर्फे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य चित्रकला स्पर्धेमध्ये जवळपास ११७ शाळेने सहभाग घेऊन २६,७८२ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाचे बँकेचे संस्थापक माजी महापौर मनोहर सपाटे बोलत असताना बँकेच्या वतीने सुकन्या सन्मान ठेव योजना आकर्षक व्याजदर सह अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेच्या येथे असलेल्या उपस्थित पालकांना व नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले. यावेळी खासदार शरद पवार काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने या तिन्ही नेत्यांना सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव, व उपस्थित असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व बँकेच्या प्रगतीचा अहवाल बँकेचे चेअरमन महेश माने यांनी केला. अलेल्या मान्यवरांचा परिचय सांस्कृतिक चेअरमन ज्ञानेश्वर सपाटे यांनी केले. याप्रसंगी चंद्रकांत पवार अक्षय वाक्षे दीपक कन्ना महादेव गवळी राजेंद्र अवताडे, मुकुंद जाधव, माणिक प्रभू मुळे, विनायकराव पाटील, तानाजी माने, सचिन कदम, अनिल बारबोले, राजेंद्र शिंदे, बालाजी जक्का, रेखा सपाटे, सुजाता जूगदार, महानंदा सोलापूरे, शिवदास चटके, उषा गोकळे, उदय पवार, दत्ता भोसले, मोहम्मद शेख आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका पंडित अश्विन आलदार व आभार राजेंद्र आवताडे यांनी मानले.