सोलापूर : शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये शाळेचे प्रेरणास्थान स्व.नागेश करजगी यांच्या १९ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रशालेमध्ये रक्तदान व नेत्ररोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी भाग्यश्री पवार व रेणू पवार यांच्याकडून स्व.नागेश अण्णा करजगी यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार करजगी, संस्थेच्या सचिवा वर्षा विभुते, संस्थेचे विश्वस्थ सोमनाथ करजगी , राजेश करजगी, व्यवस्थापक अक्षय चिडगूंपी, युवा उद्योजक यशराज करजगी, प्राचार्या रुपाली हजारे, प्री.प्रायमरी प्राचार्या अन्नपूर्णा अनगोंडा, जेष्ठ शिक्षक श्रीकांत जोशी उपस्थित होते.
या अभिवादन कार्यक्रमानंतर स्कुल च्या असेम्बली हॉल मध्ये रक्तदान व नेत्ररोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी हिंद लॅब सोलापूर यांच्या कडून प्रशालेतील सर्व शिक्षकांची आरोग्य चाचणी करण्यात आली. या शिबिरास स्कुल चे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच सोलापूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन तृप्ती चाटी यांनी केले.रक्तदान शिबिरास डॉ.हेगडेवार रक्तकेंद्र सोलापूर व नेत्ररोग शिबिरास देसाई नेत्रालय हडपसर, पुणे यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कुलचे प्राचार्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.