येस न्युज मराठी नेटवर्क : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व शरद नागरी सहकारी बँकेच्या रोपे महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त महिलांसाठी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये ज्योती दीपक करंजे यांनी प्रथम क्रमांक मिळवून दहा हजार रुपयाची पैठणी पटकावली. कार्यक्रमाचे उद्घाटन जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व आकाशात फुगे सोडून श्वेता नरखेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी नरखेडकर यांनी शरद पवारांनी महिलांविषयी राबवलेल्या धोरणामुळे आज अनेक क्षेत्रात महिला प्रगती पदावर आहेत असे मनोगत व्यक्त केले..
प्रतीक्षा सुनील पवार द्वितीय, ऐश्वर्या शिंदे तृतीय यांना पैठणी भेट म्हणून देण्यात आल्या. गौरी डंके, अंजली कुदळे, रेणुका भिसे,नीलम पवार, रेवती साठे, प्रमिला दिघे, प्रिया देवकते यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आले..
बँकेचे संस्थापक मनोहर सपाटे, माजी महापौर महेश कोठे, बँकेचे चेअरमन महेश माने, संस्कृतिक समितीचे चेअरमन ज्ञानेश्वर सपाटे, व्हाईसचे चेअरमन महानंदा सोलापूरे, मोटर वाहन निरीक्षक श्वेता नरखेडकर, मोहिनी चटके, राजेंद्र अवताडे, सुजाता जोगदार, यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण पार पडला..
शरद पवार प्रशालेच्या मैदानात घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये 210 महिलांनी सहभाग नोंदवला होता, तर कार्यक्रम साठी 2000 पेक्षा अधिक महिलांची उपस्थिती होती..
कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक तानाजी माने, मुख्याध्यापिका सुनीता निकम, मुख्याध्यापिका सीताबाई गायकवाड व शरदचंद्र पवार शिक्षण समितीतील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केली.या कार्यक्रमासाठी दत्तबुवा शिंदे, हनुमंत बेसुळके,नाना सलगर, एकनाथ घाडगे, सौदागर सावंत, दत्ता भोसले, महादेव गवळी, लता फुटाणे, लता ढेरे आदींची उपस्थिती होती.सूत्रसंचालन स्वाती नागरिक सुलोचना मुनाळे, अविनाश आलदर, नितीन मिस्कीन यांनी केले, तर आभार स्नेहलता देशमुख यांनी मानले..