येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयामध्ये महापालिका पत्रकार संघाच्या सर्व प्रतिनिधींचा सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपआयुक्त जमीर लेंगरेकर यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक केली.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची आठवणीना उजाळा दिला.त्यानंतर महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते व महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकारांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सभागृहनेते श्रीनिवास करली, गटनेते रियाज खरादी,उपायुक्त जमीर लेंगरेकर, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे तसेच महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दीना निमित्ताने शुभेच्छा दिल्या. पत्रकारांनी सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यांनी नागरिकांपर्यंत व समाजमध्ये माध्यमातून विविध बाबींचा व शासनाने वेळोवेळी घालून दिलेले नियम पोहचवण्याचा काम उत्तम रित्या केले आहे. तसेच पत्रकार हे महापालिकेला प्रत्येक वेळेला सहकार्य करतात व महापालिकेच्या सर्व बाबतीत उत्तम रित्या लेखन त्यांचे सुरू असतात जे सत्य आहे ते सत्य जे सत्य नाही असे परखड मत ते पत्रकार आपल्या माध्यमातून मांडणी करतात असे महापौर श्रीकांचना यन्नम म्हणाल्या.यावेळी आयुक्त पि.शिवशंकर यांनी उपस्थिती पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून पूर्ण देशाच्या विकासामध्ये व समाजाच्या विकासामध्ये पत्रकारांचा महत्त्वाची भूमिका आहे. सोलापुरात कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा पत्रकारांनी शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश व नियमाचे आपल्या दैनिकांमध्ये प्रसिद्धी देऊन नागरिकांपर्यंत व समाजामध्ये जनजागृती करून प्रशासनच सहकार्य केले आहे.माध्यमांच्या प्रयत्न मुळे कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास प्रयत्न झाला तसेच गणपती विसर्जन व दिवाळीमध्ये सण साजरा करताना पर्यावरणपूरक सण साजरा करावे यासाठी सुद्धा पत्रकारांनी व माध्यमांनी प्रशासनास सहकार्य केले असे आयुक्त पि.शिवशंकर यांनी म्हणाले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांनी पत्रकारांच्या या सत्काराला प्रत्युत्तर देत त्यांनी प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले तसेच महापालिकेच्या बिटच काम करत असताना प्रशासन पदाधिकारी व पत्रकार यांचा समन्वे असणे गरजेचे आहे त्यामुळे शहरातील विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी मदत होते.यावेळी पुण्यनगरीचे पत्रकार सादिक इनामदार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.