सोलापूर : लोकमंगल बँकेचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल बँकेच्या वतीने प्रधान कार्यालय येथे सोलापुरातील CA परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोलापूर मधील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
बँकेचे संचालक अभिजित टाकळीकर, सिद्धार्थ सर्जे, नरेंद्र काटीकर, बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेशसिंह बायस यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी बँकेचे संचालक अभिजित टाकळीकर यांनी प्रास्ताविक मध्ये लोकमंगल समूहाची सविस्तर माहिती सांगितले. बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेशसिंह बायस यांनी CA परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व सोलापूरच्या आपल्या योगदानात लोकमंगल समूह आपल्या नेहमी पाठीशी असेल अशी ग्वाही दिली.
यावेळी CA असोसिएशनचे अध्यक्ष आनंद पेशवे, CA असोसिएशन माजी अध्यक्ष शांतकुमार हिरेमठ, CA प्रभाकर गुंजाळ यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
या पत्रकारांचा करण्यात आला सन्मान
शिवाजी सुरवसे (येस न्यूज मराठी चॅनेल प्रमुख)
आफताब शेख (ABP माझा जिल्हा प्रतिनिधी)
सागर सुरवसे (TV9 जिल्हा प्रतिनिधी)
कृष्णकांत चव्हाण (दैनिक पुण्यनगरी)
काशिनाथ वाघमारे (दैनिक लोकमत)