सोलापूर – जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापुर शहर गुन्हा रजि. नं १८२ / २०२३ भा.द.वि.स.कलम- ३९२,३४ प्रमाणे दिनांक- ०६/०४/२०२३ रोजी गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील फिर्यादी नांमे इरफान जाफरहुसेन (वय-३३ वर्षे, व्यवसाय- ड्रायव्हर, रा.मु.पो अरोळी, ता. मानवी, जि. रायचुर, राज्य कर्नाटक) यांनी दिनांक ०२/०४/२०२३ रोजी सकाळी ०९.०० वा. मार्केट यार्ड येथील कांद्याचे पोते भरुन जाणे करीता त्यांची ट्रक मार्केट यार्ड समोरील अँग्रो मील येथे लावलेली होती. त्यानंतर फिर्यादी जेवण वगैरे करुन ट्रकमध्ये मोबाईल बघत बसलेले असताना दोन अज्ञात इसमानी फिर्यादी यांचे हातातील मोबाईल हिस्कावुन घेवुन झटापटी करुन तेथुन मोटार सायकल वरुन पळुन गेले होते. सदर बाबत जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचे तपास सपोनि / व्हि. एच. पवार यांचेकडे होता
दिनांक ०८/०४/२०२३ रोजी सपोनि व्ही. एच पवार व डी.बी. स्टाफ यांना फिर्यादी यांनी सांगितलेल्या वर्णना प्रमाणे यातील निष्पन्न आरोपी नांमे- १) अक्षय सिताराम कांबळे, (वय २२ वर्षे, धंदा-हमाली, रा. भारतरत्न इंदीरा नगर, गेंट्याल टॉकीजच्या पाठिमागे, सोलापूर) २) इम्रान शब्बीर इनामदार (वय २४ वर्षे, धंदा मजुरी, रा. रा. भारतरत्न इंदीरा नगर, गेंट्याल टॉकीजच्या पाठिमागे, सोलापूर) हे मार्केट यार्ड परिसरात फिरत असल्याचे बातमी मिळाल्याने तेथे जाऊन त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन कौशल्यपूर्वक सखोल तपास केले असता त्यांनी वरिल गुन्हा केल्याचे कबुली दिले व विविध ठिकाणाहुन एकुण ३२ विविध कंपनीचे मोबाईल (३७७०००) रुपयाचे कि.अं. मुददेमाल चोरलेबाबत सांगितले व नमुद मोबाईल काढून दिले व हस्तगत करुन अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त राजेंद्र माने सो., पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कवाडे सहा. पोलीस आयुक्त विभाग १ संतोष गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांचे मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सपोनि व्हि. एच. पवार, पोसई/सी.के. ताकभाते, पोहेकॉ / २०७६ श्रीकांत आनंदा पवार, पोहेकॉ / १६८५ खाजप्पा परसप्पा आरेनवरु पोना/ १३८६ भारत श्रीपती गायकवाड, पोना/१३७० शीतल अशोक शिवशरण, पोना / १३८७ सचिन दिगंबर बाबर, पोना/ ६२८ सुरेश ईरेशा जमादार, पोना/ १२६८ अव्याज रशिद बागलकोटे, पोकॉ/ ६१३ स्वप्नील उत्तम कसगावडे, पोकॉ/ १५३३ सोमनाथ वासुदेव थिटे, पोकों/ १६८ उमेश मारुती कात्रजकर यांनी पार पाडली आहे.