उमेदवारांना मिळणार थेट नोकरीची संधी
इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी केलं
सोलापूर : जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्था व आर्मेका फायनान्स कंपनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दि. ११ जून रोजी जॉब फेयरचे आयोजन करण्यात आले आहे. भवानी पेठ घोंगडे वस्ती येथील अथर्व गार्डनमध्ये सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा जॉब फेयर चालणार आहे. सोलापुरातील युवक युवतींनी विशेषत: कन्नड व तेलगू भाषिक उमेदवारांनी या जॉब फेयरला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन माजी सभागृह नेते आणि जेमिनी बहुउद्देशीय संस्थेचे प्रमुख सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जॉब फेयरचे उद्घाटन रविवारी सकाळी १०:०० वाजता होणार आहे. यावेळी आर्मेका फायनान्स कंपनी, पुणे यांच्या हस्ते इच्छुक उमेदवारांना थेट नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या जॉब फेयरमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून जॉब फेयरमध्ये प्रवेश संपूर्णतः मोफत ठेवण्यात आला आहे.
जॉब फेयरमध्ये सहभागी होण्यासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून १८ ते ३० वयोगटातील युवकांना या सहभागी होता येणार आहे. कन्नड व तेलगू भाषिक युवकांना यात प्राधान्य राहणार असून निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगार देण्यात येणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.
सोलापूरात उच्चतम बुद्धिमत्तेची तरुणाई आहे. परंतु नोकरी मिळत नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेने पुढाकार घेऊन या जॉब फेयरचे आयोजन केले आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. वरील निकष पूर्ण करणाऱ्या सोलापुरातील युवक युवतींनी विशेषत: कन्नड व तेलगू भाषिक उमेदवारांनी या जॉब फेयरला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन यावेळी जेमिनी बहुउद्देशीय संस्थेचे प्रमुख सुरेश पाटील यांनी केले. या पत्रकार परिषदेस जेमिनी बहुउद्देशीय संस्थेचे ..आदी उपस्थित होते.