बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूनं सर्वाधिक मतं
झारखंड : झारखंडचे मु्ख्यमंत्री चंपई सोरेन यांनी विश्वासदर्शक ठरवा जिंकला. झारखंड विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणी अर्थात फ्लोअर टेस्टमध्ये सोरेन सरकार पास झालं. चंपई सोरेन यांच्या समर्थनार्थ 47 मतं मिळाली, तर विरोधात 29 मतं गेली. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळाप्रकरणात मनी लॉड्रिंगप्रकरणात ईडीने 31 जानेवारीला अटक केली, त्यानंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी बहुमत सिद्ध केलं आहे. या बहुमत चाचणीला हेमंत सोरेन देखील उपस्थित होते, यावेळी त्यांनी भावनिक भाषण केलं. झारखंड मुक्ती मोर्चा अर्थात JMM नेतृत्त्वातील 40 आमदार थेट हैदराबादमध्ये गेले होते. त्यानंतर काल रात्री ते रांचीला परतले.
बहुमत सिद्ध करण्यासाठी दिला होता दहा दिवसांचा वेळ
झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून 2 फेब्रुवारी रोजी शपथ घेतली. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने झारखंडचे हेमंत सोरेन यांना अटक केली, त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी चंपई सोरेन यांना पद आणि गोपनियेतेची शपथ दिली होती. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी यांनी चंपई सोरेन यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी दहा दिवसांचा वेळ दिला होता.