विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली. शरद पवार शेकापचे जयंत पाटील यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत जिंकणार कोण? ऐवजी पडणार कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भाजपाचे पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर हे पाच उमेदवार विजयी झाले. शिंदे गटाच्या भावना गवळी आणि कृमाल तुमाने हे देखील जिंकले. अजित पवार गटाचे राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे यांच्याही गळ्यात आमदारकीची माळ पडली. उद्धव ठाकरेचे विश्वासू मिलिंद नार्वेकर, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव निवडणुकीत विजयी झाले. त्यामुळे जयंत पाटील यांच्याच पराभवाची जोरदार चर्चा सुरू आहे