महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
भाषेत गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.
त्याचवेळी इंग्रजी सत्ताधार्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते. मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते. प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. 1832 मध्ये सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र 1840 पर्यंत चालले.
“8 जुलै 1840 पर्यंत ‘दर्पण’ सुरू राहिला. 1 मे 1840 रोजी त्यांनी ‘दिग्दर्शन’ हे मासिक सुरू केलं. गणित, भूगोल, इतिहास अशा विविध विषयांवर त्यांनी ग्रंथ लिहिले होते. 1845 साली त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ची मराठीतील पहिली संशोधित मुद्रित प्रत सिद्ध केली. त्यानंतर ‘शून्यलब्धी आणि मूलपरिणती गणित’, ‘इंग्लंड देशाची बखर’ यांसारखे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले,” असं नीला उपाध्ये सांगतात.
पत्रकारितेत बदल
गेल्या पावणेदोनशे वर्षांमध्ये महाराष्ट्रात स्वातंत्र्यलढ्यासह अनेक क्षेत्रांमध्ये बदल घडवण्यासाठी पत्रकारितेने योगदान दिलं आहे. आता 21व्या शतकात बदलत्या काळानुसार पत्रकारितेचे स्वरूप, पत्रकार आणि त्यांच्याकडे पाहाण्याची समाजाची दृष्टी यामध्ये काही बदल झाला का, याकडे तटस्थपणे पाहाण्याची वेळ आली आहे.
‘सत्याधारित माध्यमं टिकून राहातील’
ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर यांच्यामते आताच्या काळात सर्वच क्षेत्रात मोठे बदल झालेले दिसून येत आहेत. त्याचाच परिणाम पत्रकारितेवरही झाला आहे. त्यांच्या मते, “1947 पूर्वी स्वातंत्र्यासाठी पत्रकारांनी मोठं योगदान दिलं. स्वातंत्र्यानंतर समाजात काही ठोस बदल व्हावेत, स्वातंत्र्य अबाधित राहावं, यासाठी प्रयत्न झाले. हे सर्व 1977 पर्यंत सुरू होतं. इतकंच नव्हे तर आणबाणीच्या विरोधातही काही पत्रकार उभे ठाकले. मात्र त्यानंतर परिस्थिती बदलत गेल्याचं जाणवलं.”