जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची १३वी वार्षिक सर्वसाधारण सभा टाकळीकर मंगल कार्यालय, विजापूर रोड येथे पार पडली. या सभेचे उद्घाटन सभा अध्यक्ष सुरेश आप्पा भालके यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने करण्यात आले. संस्थापक वचेअरमन राजेंद्र हजारे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेची आज पर्यंतची तसेच भविष्यातील वाटचाल व ध्येयधोरणे यांची उपस्थितांना माहिती दिली.
याप्रसंगी त्यांनी सन २०२४- २५ या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी रु.२२२कोटी व कर्ज वाटप रु.१९१ कोटी तसेच नफा रु.१कोटी ४५ लाख झालेला असल्यामुळे संचालक मंडळाने १३% लाभांश जाहीर केला असल्याचे सांगितले.संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशा हजारे यांनी सभेसाठी उपस्थित असलेल्या खातेदार,कर्जदार, ठेवीदार, यांच्यासमोर तेराव्या वार्षिक अहवालाचे वाचन केले व उपस्थितांकडून आलेल्या सूचनांचे स्वागत करून त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल अशी खात्री दिली.सभे निमित्त संस्थेतील ज्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना इयत्ता दहावी व बारावी मध्ये ८० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत त्यांचा रु.५०००/- रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.तसेच संस्थेतील ज्या खातेदारांच्या मुलांनी इयत्ता दहावी,बारावी इंजीनियरिंग,मेडिकल व स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे त्यांचा पारितोषिक देऊन व आदर्श कर्जदारांचा नॅपकिन बुके देऊन सत्कार करण्यात आला.संस्थेच्या सन २०२४- २०२५ या आर्थिक वर्षामध्ये उद्दीष्ट पुर्ण केलेल्या पाच शाखांचा नियमावली प्रमाणे प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ क्रमांक काढून रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला व कर्मचाऱ्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यात आले.या सभे निमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रेरक वक्ते शिवाजीराव पवार यांनी जनकल्याण मल्टीस्टेट ही आदर्श वित्तीय सहकारी संस्था कशी आहे याबद्दलची अभ्यासपूर्ण माहिती उपस्थित असलेल्या खातेदारांना दिली.या सभेसाठी संस्थेचे व्हा.चेअरमन संजय जावळे,संचालक लक्ष्मीकांत जाधव,अमरसिंह देशमुख,कल्याण राऊत,पंडित बुळगुंडे,चंद्रकांत पाटील ,नितीन कुलकर्णी,रणजीत हजारे संचालिका प्रियांका पाटील, गवळण गायकवाड तज्ञ संचालक सचिन कट्टे(सी.ए),तानाजी तानगावडे उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन बापूसाहेब दळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन भोसले यांनी केले.सभा यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.