सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 17 जागा पटकावित परिवार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले. या बँकेच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड उद्या शनिवारी होणार आहे. बँकेच्या निवडणुकीत बँक बचावpanel चा पराभव झाला असला तरी या पॅनलच्या उमेदवारांना चार ते पाच हजार यादरम्यान मते मिळाली आहेत . परिवार पॅनलचे उमेदवार जवळपास चार हजार मतांच्या फरकाने विजयी झाले . परिवार पॅनलचे प्रमुख किशोर देशपांडे यांना आता तज्ञ संचालक म्हणून सामावून घेणार का याबाबत सभासदांमध्ये चर्चा होत आहे. सर्व निर्णय आर्थिक निकषावरच घेणे आवश्यक आहे..