पंढरपूर : गावातील मतभेद, भावकितील भांडणे, पैशाचा अपव्यय होऊ नये म्हणून धाराशीव कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्राम पंचायतीस 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी ग्राम पंचायत बिन विरोध झाल्याने चेअरमन अभिजित पाटील यांनी आज जैनवाडी ग्राम पंचायतीला 1 लाख रुपयांचा धनादेश दिला. आज ग्राम पंचायत निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यामध्ये 12 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे जैनवाडी ग्राम पंचायत बिनविरोध झाली.
धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी राज्यात सर्वप्रथम ग्राम पंचायत निवडणूक बिन विरोध करण्यासाठी प्रयत्न केले. आणि ज्या ग्राम पंचायती बिन विरोध होतील त्या गावांना विकासासाठी व्यक्तिगत 1 लक्ष रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज जैनवाडी ग्राम पंचायत बिन विरोध झाल्याने 1 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.