सोलापूर : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. सलग चौदाव्या वर्षी शाळेच्या निकालात सातत्यपूर्ण गुणवत्ता दिसून आली असून, यंदा ७ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.
सैनिक शाळेतील अव्वल तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
- तेजस शुक्राचार्य ढोरे – 84.83% (प्रथम)
- श्रेयश गोरखनाथ बगडे – 81.50% (द्वितीय)
- आर्यन मनोहर वळसणे – 80.00% (तृतीय)
शाळेच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, प्राचार्य रवींद्र चव्हाण तसेच सैनिक शाळेचे कमांडंट अशोक कुमार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसह शिक्षक व पालकांचे मार्गदर्शनही या यशामागे महत्त्वाचे ठरले आहे.