पंढरपुरातील बहुप्रतिक्षित कॉरिडॉर… उजनी धरणाचा पर्यटन आराखडा… सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावर नाईट लँडिंग ची.. प्रस्तावित आयटी पार्कला गती देणे… बऱ्याच दिवसापासून चर्चेत असलेल्या गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक चे रूपांतर गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये करणे.. सोळा वर्षापासून रखडलेल्या सोलापूर शहरातील उड्डाणपूलांच्या भूसंपादनाचा विषय मार्गी लावणे.. उजनी धरणाच्या अर्धवट राहिलेल्या कालव्यांचा प्रश्न मार्गी लावणे.. आदी विविध प्रश्नांबाबत राज्याच्या बजेटमध्ये ठोस काही दिसत नाही. त्यामुळे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील आमदारांनी याबाबत आवाज उठून हे प्रश्न मार्गी लावावेत अशीच उद्योजक आणि व्यापाऱ्यांची मागणी होत आहे.
