मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगतीली एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात येतेय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका शायरीद्वारे चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय.
अमोल मिटकरी यांनी सुप्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांच्या शायरीद्वारे चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तेरी जुबान कतरना बहुत जरुरी है… ‘तुझे मर्ज है की तू बार-बार बोलता है!’ अशा शब्दात मिटकरी यांनी पाटलांवर टीका केलीय. शरद पवार हे जेव्हा संसदेत होते. त्यावेळी हे महाशय चड्डी आणि टोपीत होते, अशी टीकाही मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर केलीय.