सोलापूर सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र उत्सव महामंडळाच्या वतीने विजयादशमीच्या पवित्र दिवशी
पार्क मैदानावर असलेल्या शमी झाडाच्या सोने सिमोलंगण खेळण्यासाठी सोलापूर शहराची शेकडो वर्षांची परंपरा असल्याने शहरातील पाच देवस्थानाचे पालखी, काठी, छबिना आणि सार्वजनिक मंडळाच्या श्री देवीच्या मुर्ती सह वाजत गाजत लेझीम, झांज पथकासह विविध मार्गाने येऊन मध्यवर्ती मंडळात सहभागी होतात, अशा मंडळाच्या पदाधिकारी व देवस्थानाचे ट्रस्टी यांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली, या बैठकीत मिरवणूक बाबतीत येणाऱ्या अडचणी आणि सिमोलंगणचे ठिकाण आदी विषयावर गांभीर्याने चर्चा केली.
बैठकिच्या अध्यक्ष स्थानी दास काका शेळके होते,
तसेच विश्वस्त दिलीप भाऊ कोल्हे, अमोल बापू शिंदे
विजय पुकाळे, उत्सव अध्यक्ष प्रशांत बाबर, सचिव दत्तात्रय मेनकुदळे आदिंनी परघडपणे विचार व्यक्त केले,
या बैठकीला शिवानंद सावळगी, सचिन धोतत्रे,मल्लिनाथ गिराम आदी मान्यवर व शहरातील नवरात्र मंडळाचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते